साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हेल्‍पलाईन कक्ष सुरु

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर हि धार्मिक स्थळे खूली करण्यात आली आहे.

यातच जगप्रसिद्ध शिर्डी येथील साईबाबांचा दरबार देखील खुला करण्यात आला आहे. साईंच्य दर्शनाचा लालभ घेता यावा तेही सोईस्करररीत्या यासाठी आता हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला आहे. हेल्‍पलाईन कक्ष, कंट्रोल रुम व WhatsApp ही सुविधा कायमस्‍वरुपी २४ तास सुरु करण्‍यात आलेली आहे.

१६ नोव्‍हेंबर २०२० पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर साईभक्‍तांना शिर्डीची वारी व श्रीं चे दर्शन सुलभरित्‍या व्‍हावे या उद्देशाने संस्‍थानच्‍या वतीने साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

दरम्यान कोरोनाचे सावट संपले नसुन मंदिर खुले झाल्‍यामुळे हजारो साईभक्‍त श्रींच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता शिर्डी येथे येत आहे. या साईभक्‍तांना शिर्डी येथे येण्‍यापुर्वी व आल्‍यानंतर निवास, भोजन, वैद्यकीय सेवा व दर्शनाची परिपुर्ण माहिती सहज व सुलभरित्‍या मिळावी.

तसेच त्‍यांची फसवणुक होऊ नये या उद्देशाने संस्‍थानच्‍या वतीने हेल्‍पलाईन कक्ष, कंट्रोल रुमची निर्मीती करण्‍यात आलेली आहे. हे कक्ष साईभक्‍तांकरीता कायमस्‍वरुपी २४ तास उपलब्‍ध असणार आहे.

याकरीता श्री साईबाबा संस्‍थानचे हेल्‍पलाईन मोबाईल नंबर 7588374469 / 7588373189 / 7588375204, कंट्रोल रुम मोबाईल नंबर 7588371245/ 7588372254 व WhatsApp नंबर 9403825314हे क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News