नगरच्या हेमा कोगेंचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन व शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात नगरच्या उपक्रमशील शिक्षिका हेमा जगदीश कोंगे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार मनुष्य विकास लोक सेवा अकादमीचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते कोंगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेली उपक्रमशील आदर्श शिक्षिका हेमा जगदीश कोंगे या इंग्रजी शाळेतील अनुभवी व प्रयोगशील शिक्षिका असून.

या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थी घडविण्याकरिता त्या नेहमीच फक्त फळा व खडू यांचा उपयोग न करता वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण प्रयोगशील शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्या करीत आहेत.

त्या इंग्रजी माध्यमाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जे क्रमिक अभ्यासक्रम शिकविले जातात त्या व्यतिरिक्त जागतिक पातळीवरील अभ्यासक्रम व विविध मॉड्यूल ऑनलाइन कोर्सेस या सर्व अत्याधुनिक तंत्राचा वापर करून विद्यार्थी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे.

सध्या त्या सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह एज्युकेशन्यालीस्ट अँड सायंटिफिक रिसर्च प्रोफेशनल, चेन्नई तामिळनाडू या नामांकित संस्थेमध्ये प्रोग्राम डेव्हलपमेंट एक्झिकेटीव्ह म्हणून कार्यरत आहेत.

तसेच कोंगे यांना इनोव्हेटिव्ह सायंटिफिक रिसर्च प्रोफेशनल मलेशिया या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेने त्यांना मागील वर्षी 2019 मध्ये इनोव्हेटिव्ह अ‍ॅण्ड डेडिकेटेड टीचर हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांची एज्युकेशन बोर्ड मेंबर कन्सल्टंट म्हणून निवड केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment