बिबट्याच्या हल्ल्यात ‘तिचा’ मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील शेतकरी भाऊसाहेब राऊसाहेब बोर्डे यांच्या गोठ्यातील कालवडीवर रात्रीच्या वेळी बिबट्याने शनिवारी हल्ला केला.

गंभीर जखमी झाल्याने कालवडीचा मृत्यू झाला. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी व पारनेर तालुक्यातील अनेक गावांत बिबट्यांकडून होणारे हल्ले ही गंभीर समस्या बनली आहे. पिंजऱ्यात अडकलेले बिबटे दूर जंगलात नेऊन सोडत असले,

तरी त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली जात नसल्याने बिबटे पुन्हा लोकवस्तीकडे येतात, असा ग्रामस्थांचा अनुभव आहे. वनविभागाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News