अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-सासरच्या व्यक्तींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून संगमनेर शहरात राहणाऱ्या एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अवघ्या काही महिन्यांपूर्वीच घरच्या माणसांचा विरोध झुगारुन प्रेमविवाह करुन सुखीसंसाराचे स्वप्नं पाहणार्या संगमनेर शहरातील लालतारा वसाहतीमधील एकवीस वर्षीय वैष्णवीने त्याच वसाहतीमधील राहुल पांडुरंग घोडेकर या तरुणावर विश्वास ठेवून त्याच्याशी प्रेमविवाह केला.
मात्र सासरच्या छळास कंटाळून वैतागून ती तरुणी पुन्हा नाईलाजाने आपल्या माहेरी परतली. मात्र तरीही सासरच्यांकडून तिचा छळ सुरूच होता. या गोष्टींनावैतागून, नैराश्य आलेल्या त्या नवविवाहितेने अखेर टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्या करीत आपले जीवन संपविले.
दरम्यान आजकाल प्रेमविवाह व त्यांनतर वाद व थेट टोकाची भूमिका घेत जीवनयात्रा संपविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. तरुणाई या दिवसात आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक पाऊले उचलतात. खेळण्या बागडण्याच्या दिवसात प्रेमाकडे आकर्षित होतात व नको असे पाऊल उचलतात यामुळे अनेकदा अनर्थ घडला आहे.
दरम्यान गेल्या काही कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यातून बेपत्ता होणार्या मुलींचा आकडा सातत्याने वाढत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे बेपत्ता होणार्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींचीही मोठी संख्या असणं धोक्याचा आणि सावध होण्याचाच इशारा आहे.
आधुनिक युगातील पालकांचे पालकत्त्व कोठेतरी कमी पडतंय असंच जणू या घटना वारंवार सांगत आहेत. शिक्षणाच्या वयात शिक्षणच घेतलं पाहिजे. त्यातूनच आपण परिपक्व होतो, त्यानंतर जीवनाचा काय तो विचार करायला मोकळीकच असल्याचा विश्वास आजच्या विद्यार्थ्यांमध्ये भरण्याची गरज आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved