शिर्डी पोलिसांनी केला हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; तीन पीडित मुलींची सुटका

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील शिर्डीचे साईबाबा यांचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील देखील भाविक येतात. त्यामुळे शिर्डी हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र झालेले आहे. त्यामुळे त्याचे पावित्र्य जपणे देखील आपले आद्यकर्तव्ये आहे.

मात्र अनेकजण या पवित्र ठिकाणी अत्यंत चुकीचे व्यवसाय करतात. हि बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. नुकतीच पोलिसांनी येथील एका हॉटेलवर छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

याबाबत अधिक माहिती अशी, शिर्डी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालखी रोडवरील हॉटेल साई वसंत विहारमध्ये तीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती शिर्डी विभागाचे डीवायएसपी शिरीष वमने यांना गुप्त बातमीदाराने दिली होती.

त्यानुसार त्यांनी हॉटेल साई वसंत विहारमध्ये एक बनावट ग्राहक पाठविले. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीस त्यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीने त्याच्या हॉटेलमधील मुली दाखवून शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली.

त्यांना मिळालेल्या माहितीनुसार येथे वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची पथकातील अधिकारी व पंचांची खात्री होतात हॉटेल साई वसंत विहार येथे छापा टाकून तीन मुलींना आणि वेश्याव्यवसाय चालवणारा शुभम अशोक आदमाने यास ताब्यात घेतले.

दरम्यान त्याचा साथीदार नाना शेळके हा फरार झाला. या दोघाविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शिर्डीत राजरोसपणे मोठ्या प्रमाणात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा व्यवसाय सुरू आहे. शिर्डी शहराच्यादृष्टीने ही लाजिरवाणी बाब आहे. पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजिंगवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe