ह्या कारणामुळे झाला त्यांचा खून, सविस्तर घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील विसापूर फाट्यानजिक जळगाव जिल्ह्यातील काही व्यक्ती दोन महिलांसह एका वाहनातून सुरेगाव-विसापूर फाटा या ठिकाणी स्वस्तात सोने घेण्यासाठी आले होते.

मात्र, आपली फसवणूक होत आहे हे लक्षात येताच त्यांनी चाकूने सपासप वार करून चौघांना जागीच ठार केले. त्यामुळे स्वस्तात सोने महागात नव्हे, तर जीवावर बेतले अाहे. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास त्या चाैघांचा खून झाला हाेता.

या प्रकरणातील स्वस्तात सोने घेण्यावरून झालेल्या प्रकारातून हे खून झाल्याचे पाेलिसांच्या प्राथमिक तपासात निष्कर्ष समोर येत आहे.

श्रीगोंदे तालुक्यात अनेक ठिकाणी स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून अनेकांना लुटल्याच्या अनेक घटना ताज्या अाहेत. जळगाव जिल्ह्यातील काही लोक स्वस्तात सोने घेण्याच्या आमिषाने सुरेगाव-विसापूर फाटा या ठिकाणी आले हाेते.

मात्र, आपली फसवणूक होऊ शकते याची शक्यता त्यांना असल्याने जळगाव जिल्ह्यातील लोक तयारीनिशी आले होते. त्यातील एकाने हातात एक धारदार चाकू लपवला होता.

ठरल्याप्रमाणे पैशाची बॅग दिसली की ती हिसकावली गेली. मात्र त्याच वेळी समोरच्या व्यक्तीने सपासप वार करीत त्या चार जणांना ठार केले.

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश सिंग रात्रीपासून बेलवंडी पोलिस ठाण्यात तळ ठोकून असून तपासाची सूत्रे त्यांनी स्वतःकडे घेतली असल्याची माहिती आहे.

मात्र गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या या हत्याकांडाचे वास्तव्य वेगळेच निघत आहे. असे मृताच्या आईने तिच्या सख्या भावाविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

यात अक्षय उंबऱ्या काळे, मिथून उंबऱ्या काळे व इतर पाच ते चार अनोळखी व्यक्तींनी तिचा मुलगा नाथिक खुज्या चव्हाण, श्रीधर चव्हाण, नागेश चव्हाण व लिंबू काळे यांचा खून केला.

यासाठी फिर्यादीत पूर्वीचे वाद दाखवण्यात आले. पोलिसांनी घेतलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असला तरीही या घटनेची न दिसणारी तपासाची दिशा आता जाणार असल्याची माहिती पोलिस सू़त्रांकडून मिळाली आहे.

परंतु आरोपींना पकडल्यानंतर यातील मुख्य कारण समोर येऊ शकते. प्राथमिक तपासात हे प्रकरण मात्र स्वस्तात सोने घेण्यावरून झाल्याचे समोर येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment