हॉटेल व्यावसायिकावर शेजाऱ्याचा कुऱ्हाडीने हल्ला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  हॉटेल व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना राहाता शहरानजिक गोदावरी कॅनॉलच्या कडेला हॉटेल लोकसेवाजवळ पिंपळस हद्दीत शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

या घटनेत हॉटेल व्यावसायिक नदीम रौफ सय्यद (वय २४) हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

घरच्यांना शेजारचे बोलल्याचा राग मनात ठेवून आरोपी सचिन उत्तम पवार (वय २०, रा. पिपंळस, हॉटेल लोकसेवा जवळ) हा शेजारी राहणारे हॉटेल व्यावसायिक नदीम रऊफ सय्यद यांच्या घरी गेला त्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.

यामध्ये नदीम गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना ग्रामीण रूग्णालयात नण्यात आले, नंतर तेथून शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, राहाता पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी घटनास्थळी भेट दिली.

याप्रकरणी जखमी नदीम सय्यद यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी सचिन पवारविरूद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी सचिन पवार यास पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment