कोरोना रोखण्यासाठी गृहिणींनी पुढाकार घ्यावा

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृहिनींनी पुढाकार घेऊन कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन राहात्याच्या नगराध्यक्ष ममता पिपाडा यांनी केले.

राहाता नगरपालिकेत हळदी-कुंकू समारंभ तसेच माझी वसुंधरा अभियान व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जन जागृती या कार्यक्रामात पिपाडा बोलत होत्या.

राहाता नगरपालिकेत नगरपालिका अंतर्गत हळदी कुंकू समारंभ तसेच माझी वसुंधरा अभियान व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष पिपाडा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, आरोग्य सभापती विजय सदाफळ, महिला व बालकल्याण सभापती सविता सदाफळ,

विमल आरणे, बांधकाम सभापती अनुराधा तुपे, नगरसेविका सुरेखा मेहेत्रे, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ जगताप, सचिन मेहेत्रे, दशरथ तुपे तसेच राहाता शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने राहाता शहरातील महिला मास्क तसेच सोशल डिटन्सिंगचे पालन करुन राहाता नगरपालिकेत उपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्ष पिपाडा म्हणाल्या की,

कोरोना विषाणुने पुन्हा एकदा संसर्ग वाढला असुन गृहिणी म्हणुन आपण विषेश काळजी घ्यावी. दक्षता घेवुन आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले,

की कोराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नव्याने नियमावली तयार केली आहे. त्या नियमांचे पालन करुन स्वत:ची व परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा प्रशासन पुन्हा एकदा लॉक डाऊनच्या दिशेने पाऊल उचलेल.

यावेळी अनेक महिलांनी उखाने घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी दशरथ तुपे यांनी प्रास्ताविक केले व नगरसेवक भिमराज निकाळे यांनी आभार व्यक्त केले.