अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- देश रक्षणाचे कर्तव्य बजावून स्वत:च्या लग्नासाठी परवानगी घेऊन आपल्या गावी मौजे धामोरी खुर्द (ता. राहुरी) येथे परतलेल्या भारतीय लष्करातील जवानाला गावा बाहेरील शाळेत क्वारन्टाईन होण्याची वेळ आली आहे.
क्वारन्टाईन होऊन देखील जेवणाची व राहण्याची सुविधा नसून, सैनिकांचे हाल केले जात असल्याचा आरोप मेजर अशोक कुसमूडे यांनी केला आहे. अशोक कुसमूडे हे भारतीय लष्करात जवान म्हणून जोधपूर (राजस्थान) येथे कर्तव्यावर होते.
त्यांनी दि.31 मे रोजी घरीच होणार्या स्वत:च्या लग्नासाठी 45 दिवसाची रजा टाकली आहे. कुसमूडे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी करुन सहा महिन्यानंतर गावात आले असता त्यांना गावा बाहेर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत संस्थात्मक क्वारन्टाईन करण्यात आले.
या जिल्हा परिषदेच्या शाळेत एखाद्या आरोपीप्रमाणे आणून टाकण्यात आले आहे. येथे जेवणाची, आंघोळीची, झोपण्याची कोणतीही सोय नसल्याने हाल होत आहे.
तर येथे आल्यापासून आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर देखील फिरकले नसल्याचा आरोप कुसमूडे यांनी केला आहे. देश रक्षणाचे कार्य करणार्या सैनिकांना कोरोनाच्या संकटकाळात अशा पध्दतीने चुकीची वागणुक दिली जात आहे.
पुर्ण वैद्यकिय तपासणी करुन देखील जवानांना गावाबाहेर क्वारन्टाईन केले जात आहे. आपले रक्षण करणार्या जवानांप्रती आपुलकी ठेवण्याची गरज असून, त्यांना होम क्वारन्टाईन करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com