अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अकोले तालुक्यात बुधवारी सकाळी १४ कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली.
मंगळवारी सायंकाळी जांभळे येथील ६१ वर्षीय महिला, बदगी बेलापूर येथील ४७ वर्षीय पुरुष व कोतूळ येथील ५१ वर्षीय पुरुषाचा आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अौरंगपूर येथील २२ वर्षीय तरुणाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला.
बुधवारी सकाळी माणिकाओझर येथील १०, राजूर येथील दोन, वाघापूर व निब्रळ येथील प्रत्येकी एक अशा १४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.
उपचारांनंतर ६६ जण कोरोनामुक्त झाले असून ३ जणांचा मृत्यू झाला. शासकीय व खासगी रुग्णालयांत ४१ जणांवर उपचार सुरू आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा