अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर – मांलुजा रस्त्यावर बुधवारी दुपारी मुरूम व माती वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहेत.(Ahmednagar Accident)
मांजरी येथील ग्रामपंचायत कर्मचारी काशिनाथ गणपत कोळेकर (वय ५०) पत्नी आधिका काशिनाथ कोळेकर (वय ४६) हे पती पत्नी गळनिंब येथून मुलीला भेटून आपल्या मांजरी गावी जात होते.
मालुंजा भेर्डापूर दरम्यान बडाख वस्तीजवळ एक टेम्पो मालुंज्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्यांची मोटारसायकल व टेम्पोची धडक झाली. मोटारसायकल टेम्पोच्या दोन्ही चाकाच्यामध्ये गुंतली गेली.
अनेक अंतर दोघेही मोटारसायकलसह फरफटत गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मालुंजाचे संरपच अच्युतराव बडाख, उपसरपंच रावसाहेब शेंडगे,
कृष्णाकांत बडाख, अॅड. केचेश्वर बडाख, विजय बडाख संजय बडाख, संतोष बडाख, दादा बडाख आदींसह अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन
तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपूरला नेले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम