अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- श्रीगोंदा शहरात भटकंती करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील राजराणी किरसकर या महिलेचा तिचे पती गणेश यांच्याशी प्रहारचे कार्यकर्ते नितीन रोही यांच्या पुढाकाराने आॅनलाईन व्हिडीओ संपर्क करण्यात आला.
मै राजराणी बोल रही हूँ. त्यावर गणेश म्हणाला, तुम कहा है, मै तुमको मिलनेको निकल रहा हूँ आणि गायब झालेल्या पत्नीशी दीड वर्षानंतर बोलणे गणेशला आकाश ठेंगणे झाले.
श्रीगोंदे शहरामधील मांडवगण रोड लगत आळेकर मळ्याच्या परिसरातील भिक्षेकरी ग्रहाच्या क्षेत्रात एक अनोळखी ३० ते ३५ वयोगटातील महिला फिरत असल्याबाबत
परिसरात चाललेल्या चर्चेनुसार रविवारी सायंकाळी उशिरा कॅनरा बँकेचे कर्मचारी सचिन रोही यांनी महिलेकडे जाऊन चौकशी केली.
तर, ती थोडी मनोविकृत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, तिच्याकडे चौकशी केली असता, तिने तिच्या घरच्यांचा मोबाईल नंबर सांगितला.
त्यावर संपर्क करत कार्यकर्त्यांनी या महिलेविषयी माहिती दिली. तर, ती महिला मागील दीड वर्षापासून घरातून बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.
ही महिला गोरठाणा पोलिस हद्दीतील लोहरा, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, दीड वर्षापूर्वी एका ट्रकला हात करून, ही महिला घरातून बेपत्ता झाल्याचे तसेच, या महिलेला भोवळ (चक्कर) सदृश्य आजार असल्याचे तिच्या पतीने फोनद्वारे रोही यांना सांगितले.
नितीन रोही,दक्ष चे दत्ता जगताप, हौसराव कोठारे, संपत कोठारे, अक्षय कोठारे, विजय नवले यांनी तिला दवाखान्यात भरती करीत स्थानिक प्रशासनास खबर देण्यासाठी मदत केली. ग्रामीण रुग्णालयामध्ये विकास तरटे, पूनम नेटके, प्रियांका लोखंडे, भारती काळे
यांनी डॉ. नितीन खामकर व डॉ. संघर्ष राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेवर उपचार सुरू केले आहेत.दोन दिवसात गणेश किरसकर हा श्रीगोंद्यात येणार आहे. त्यानंतर राजराणी व गणेश दांपत्याची भेट होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम