Ahmednagar News : विविध कारणांसाठी विवाहितेचा सासरी छळ केल्याचे अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहे. घर घेण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
सावेडी उपनगरातील निर्मलनगर येथे माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहितेने याप्रकरणी मंगळवारी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून पती आकाश श्रीमंत शिरसाठ, सासू शहाबाई श्रीमंत शिरसाठ, सासरे श्रीमंत दादाबा शिरसाठ, दीर ज्ञानेश्वर श्रीमंत शिरसाठ, जाव कविता ज्ञानेश्वर शिरसाठ (सर्व रा. टाकळी मानूर, ता. पाथर्डी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पीडित विवाहित महिलेचा विवाह ३ सप्टेंबर २०२३ रोजी आकाश शिरसाठ सोबत झाला आहे. विवाहनंतर फिर्यादी सासरी नांदत असताना सुरूवातीचे आठ ते १० दिवस त्यांना चांगले नांदवले गेले.
१३ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांचे सुरूवातीला जाव कविता शिरसाठ सोबत वाद झाले. त्यानंतर पती आकाश, सासू शहाबाई, सासरे श्रीमंत, दीर ज्ञानेश्वर यांनी फिर्यादीकडे घर घेण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये आणण्याची मागणी केली. फिर्यादीने पैसे आणले नाही म्हणून त्यांना शिवीगाळ, मारहाण करून त्याचा छळ करण्यात आला.
पती आकाश याने तु मला घटस्फोट दे मला दुसरे लग्न करायचे आहे, तु मला घटस्फोट दिला नाही तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, फिर्यादी यांनी सुरूवातीला भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समझोता न झाल्याने त्यांनी दिलेल्या पत्रानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.