बेकायदेशीर गर्भपात अथवा प्रसवपूर्व गर्भलिंग निदान होत असेल तर करा तक्रार टोल फ्री क्रमांक अथवा संकेतस्थळावर नोंदवा तक्रार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-गर्भधारणापुर्व आणि प्रसवपुर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे.

या कायद्याचे उल्लंघन करणारी केंद्रे अथवा व्यक्ती तसेच बेकायदेशीर गर्भपाताविषयी नागरिकांनी माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी केले आहे.

अशा प्रकारचे कृत्य होतांना आढळल्यास नागरिकांनी 1800-233-4475 या हेल्पलाईन क्रमांकावर तथा www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तक्रारीची खातरजमा होवुन गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणार्‍यास शासनाच्या खबर्‍या बक्षीस योजने अंतर्गत रुपये १ लाखापर्यंत बक्षीस देण्यात येईल तसेच संबंधितांचे नाव गोपनीय राखले जाईल.

त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे आणि असे प्रकार आल्यास तात्काळ उपरोक्त टोल फ्री क्रमांक अथवा वेबसाईटवर तक्रार नोंदवावी, असे डॉ. पोखरणा यांनी कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment