….. जर असे असते तर डॉ. सुजय विखे यांना पाडण्याचा दम महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यात नव्हता! डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली खंत

जो माणूस विकासाची कामे करेल त्याच्यामागे डोळे झाकून उभे राहणे गरजेचे आहे. तरच पुढच्या पिढीला चांगले आयुष्य मिळू शकते नाहीतर आपण संपून जाऊ असे आवाहन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.

Ajay Patil
Updated:
dr.sujay vikhe

Ahmednagar News: लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. सुजय विखे यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी केला व त्यानंतर मात्र आता डॉ. सुजय विखे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रमांचा धडाका लावल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

नुकतेच त्यांनी संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून त्या दृष्टिकोनातून त्यांची तयारी देखील सुरू आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात येत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे हे चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

याचाच भाग म्हणून त्यांनी राहता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपुर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ केला व महिला बचत गटांना पिठाची गिरणी तसेच भजनी मंडळांना साहित्य वाटप केले व याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,जर निवडून येण्यासाठी केलेला विकास किंवा विकास कामे हाच निकष राहिला असता तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्यात डॉ. सुजय विखे यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा दम नव्हता.

परंतु असे असले तरी जो माणूस विकासाची कामे करेल त्याच्यामागे डोळे झाकून उभे राहणे गरजेचे आहे. तरच पुढच्या पिढीला चांगले आयुष्य मिळू शकते नाहीतर आपण संपून जाऊ असे आवाहन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.

 विकास कामे निवडून येण्याचा निकष राहिला असता तर माझा पराभव झाला नसताडॉ. सुजय विखे यांची खंत

विकासकामे हे निवडून येण्याचा निकष असता, तर महाराष्ट्रात कुठल्याही नेत्यांत डॉ. सुजय विखे यांना पाडण्याचा दम नव्हता. असे असले तरी जो माणूस विकास कामे करेल, त्याच्या मागे डोळे झाकून उभे रहा. तरच पुढच्या पिढीला चांगले आयुष्य मिळेल, अन्यथा आपण संपून जावू, असे आवाहन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

कोल्हार-भगवतीपूर (ता. राहाता) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. बचत गटांना पिठाची गिरणी, भजनी मंडळांना साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभाग व डॉ. विखे पाटील फाउंडेशन संचलित दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने मुख्यमंत्री वयोश्री योजने नोंदणी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा नियोजन समिती व जनसेवा फाउंडेशन स्त्रीशक्ती संचलित साधन केंद्राच्या वतीने फूड प्रोसेसिंग युनिट वितरण डॉ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे होते. यावेळी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे, विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे, संभाजी राजे देवकर, धनंजय दळे, श्रीकांत खर्डे, सविता खर्डे, दत्तात्रय राजभोज आदी उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

मतदारसंघात कामे करूनही माझ्यासारख्या प्रामाणिक नेत्याला पराभवाला सामोरे जावे लागते, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांत मला पाडण्याची ताकद नाही. केवळ जातीपातीचे राजकारण आड आले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यापुढील काळात जातीपातीचे राजकारण न करता न सर्वसामान्य प्रश्न सोडवणाऱ्याच्या पाठीमागे न उभे रहा. कोल्हार भगवतीपूरच्या विकास 5 कामात कधी भेदभाव केला नाही.

लोणीत रस्त्याचे चौपदरीकरण केले, ते कोल्हारमध्ये आम्ही चौपदरीकरण केले. गावाला शुद्ध 5 पाणी पिण्यासाठी साठवण तलावाचे काम अंतिम टप्यात आहे. लवकरच गावाला न शुद्धपाणी मिळेल, असेही ते म्हणाले.

शिर्डी एमआयडीसीत दहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार

शिर्डी येथे नव्याने सुरू होत एमआयडीसीत शिर्डी मतदारसंघातील दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. मी केवळ आश्वासने देत नाही, तर ते पूर्ण देखील करतो. हा माझा शब्द आहे. तुम्ही आमच्यावर भरभरून पाठिंबा द्या. यापुढेही आम्ही अशीच विकास कामे करत राहू, असे आश्वासन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोल्हारकरांना दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe