वीजवाहक तर कोसळून साडेतीन एकर ऊस जळून खाक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- महावितरणच्या इलेक्ट्रीक खांबावरील मेनलाईनची तार तुटल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील साडेतीन एकर पीक ठिबक सिंचनासह जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठच्या कमालपूर शिवारात घडली आहे. बाळासाहेब भाऊसाहेब गोरे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर शिवारातील घुमनदेव रस्त्यावर गोरे या शेतकर्‍याच्या शेतातून घोगरगावकडे मेन लाईन गेली आहे.

शनिवारी अचानक मेनलाईनची तार खांबावरून निखळून लोखंडी पट्ट्यावर पडल्याने जाळ झाला. यात लोखंडी पट्ट्या देखील वितळल्या असल्याने ठिणग्या उसावर पडून उसाच्या शेतात अचानक आग लागली.

परंतु पंधरा दिवसांत तोडणीस आलेल्या उसाने रौद्ररूप धारण करून पेट घेतला होता. काही वेळातच अशोक कारखान्याच्या अग्निशमन दलाचे गाडीने एक एकर ऊस वाचविला. गाडी येईपर्यंत साडेतीन एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकर्‍यांचे ठिबक सिंचनासह मोठे नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe