अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याबाबत काही अडचण आल्यास संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक व पोलिस अधिकारी यांना समक्ष कार्यालयात नागरिकांनी भेटावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले कि, शारीरिक व अपघात गुन्ह्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र हस्तगत करण्याची जबाबदारी ही पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदारांची आहे.

मालाविरोधाच्या गुन्ह्यामध्ये अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता तसेच प्राप्त होणाऱ्या तक्रारीमध्ये सदरचा गुन्हा दखलपात्र स्वरूपाचा आहे, अथवा तो कसा? याबाबत संशय असल्यास
ललितकुमार विरुद्ध शासन या न्यायनिवाडाचा आधार घेऊन तात्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सांगितले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. वाजवी कारणाशिवाय उशिराने गुन्हे दाखल होणार नाहीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ऑक्टोबर 2020 अखेर जिल्ह्यात 245 गुन्हे उशिराने दाखल करण्यात आले होते. परंतु नोव्हेंबर 2020 अखेर दैनंदिन गुन्हे अवलोकन केले असता, ऑक्टोबर 2020 च्या तुलनेत उशिराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण 112 ने कमी झाले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com













