… अन्याय झाला, तर गय नाही : आ. रोहित पवार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-जिथं शेतकऱ्यांना मदत लागेल तिथं आपण मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन व्यवसायासाठीही ताकद देऊ.

पण कुणी एखाद्यावर अन्याय करत असेल, तर त्याची कसलीही गय करणार नाही. सुरू करण्यात आलेल्या कापूस केंद्रामुळे हमीभाव मिळणार आहे. यातून अनेकांना रोजगारही मिळेल. कापूस खरेदीमध्ये सर्वांना समान न्याय मिळावा, माझ्याही वशिल्याची गरज भासली नाही पाहिजे.

कुणीही व्यक्ती येईल, त्याला समान न्याय द्या, असे मत मिरजगाव येथील छत्रपती जिनिंग अँड प्रेसिंग प्रा. लिमिटेडच्या शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्राच्या उद््घाटनप्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आधारभूत किंमत

योजना कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ च्या उद््घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक अॅड. शिवाजीराव दसपुते,

औरंगाबाद येथील विभागीय व्यवस्थापक व्ही. बी. थिगळे, बबन काशीद, सुहास कासार, सुभाष लोंढे, महिपतलाल पटेल, त्रिंबक तनपुरे, तानाजी पिसे, संदीप बोरुडे, छत्रपती जिनिंग अँड प्रेसिंग प्रा. लिमिटेडचे संचालक राहुल पवार, भाऊसाहेब पवार, ज्ञानेश्वर जगताप, बाबासाहेब बांदल आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment