अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-तृप्ती देसाई यांनी साई मंदिरातील पेहरावप्रकरणी शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला आहे.
साई संस्थानने मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहरावात येण्याच्या केलेल्या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावर आक्षेप घेत शिर्डीत येऊन पेहरावाबाबत लावण्यात आलेला फलक काढण्याचा इशारा दिला आहे.
यावर शिर्डीतील महिलाही आक्रमक झाल्या असून त्यांनी तृप्ती देसाईंना उत्तर देण्याचा चंग बांधला आहे.शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता जगताप यांनी साई संस्थानचे सीईओ कान्हूराज बगाटे यांना या निर्णयाबद्दल धन्यवाद दिले.
पेहरावाबाबत संस्थानने विनंती केलेली आहे, सक्ती केलेली नाही या मुद्द्याकडे लक्ष वेधत जगताप यांनी महिलांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा या तृप्ती देसाई कुठे असतात, असा सवाल केला. सोवळे घालून पंचाने अंग झाकणाऱ्या पुजाऱ्यांना अर्धनग्न म्हणणाऱ्या देसाईंचे संस्कृतीबद्दलचे ज्ञान अर्धवट असल्याचे त्या म्हणाल्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved