कार वापरात असाल तर ही बातमी वाचाच… एका चुकीमुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीने या संदर्भात एक संशोधन केले. या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. कार चालवताना एसी सुरु असल्यास आणि चारही काचा बंद असल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो.

कारमध्ये हवा खेळती असल्यास विषाणूंचा फैलाव होण्याचा धोका कमी असतो असा निष्कर्षही या संशोधनातून समोर आला आहे. कारच्या सर्व काचा बंद असल्यास कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा चालकाला असतो असेही ब्राउन युनिव्हर्सिटीचे म्हणणे आहे.

हवेचा प्रवाह मागच्या बाजूने पुढच्या बाजूला सुरु असतो. त्यामुळे मागे बसलेल्या व्यक्तीच्या शिंकण्यातून उडणारे तुषार चालकापर्यंत सहज पोहोचू शकतात. यामुळे चालकाला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

कारमध्ये प्रवासादरम्यान इतर प्रवाशांना घेताना हवेचा प्रवास व्यवस्थित करुन घेतल्यास संक्रमणाचा धोका कमी केला जाऊ शकतो. कारमधून प्रवास करताना चारही खिडक्या खुल्या असणं गरजेचं असल्याचे संशोधनात म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment