तक्रारींकडे दुर्लक्ष…. शिवसेना स्टाईलने गेट झाले खुले

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-अनेक दिवसांपासून बाजारसमितीचे गेट एका बाजूने बंद होते. या बंद प्रवेशव्दारामुळे व्यापारी, शेतकर्‍यांना अडचण निर्माण होत होती.

बंद गेट खुले करावे अशी व्यापारी, शेतकर्‍यांची मागणी होती. सनदशीर मार्गाने लढा देणार्‍या व्यापार्‍यांना यश आले नाही. त्यामुळे शिवसेनेने या प्रश्नात दखल घेत कलेक्टरांसमोर हा प्रश्न उपस्थित केला.

अखेर व्यापार्‍यांची होणारी अडचण लक्षात घेत नगर शहर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी कुलूप तोडून हे गेट आज ओपन केले.

व्यापारी, शेतकर्‍यांना बाजारसमितीकडून त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तेथे शिवसेना खंबीर उभी राहिलं असे सांगत शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी हे गेट ये-जा करण्यासाठी खुले केले.

दरम्यान रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हे गेट खुले करावे अशा सूचना खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. मात्र संबंधितांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर,

शिवसेना युवा नेते विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, अमोल येवले, विशाल वालकर, मदन आढाव, संतोष गेनप्पा, मनिष गुगळे, सचिन शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी कुलूप तोडून गेट ओपन केले.