जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अवैध दारूविक्री ! पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरासह चिखली, पारगाव, श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील प्राथमिक शाळेच्या २०० मीटर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर जिल्हा परिषद शाळेत तपासणीसाठी नेमलेल्या

जिल्हा न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांच्या पथकाकडून कोप्ता कायदा २००३ अंतर्गत तसेच दारूविक्रीबाबत कारवाई करत श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब खेतमाळीस पारगाव सु., स्वप्नील ढमे, जोशी वस्ती, श्रीगोंदा फॅक्टरी, अजिंक्य होले, होलेवाडी, श्रीगोंदा, सुमन सुपेकर, श्रीगोंदा शहर, दिपक विठ्ठल झेंडे आणि अन्सार सत्तारभाई तांबोळी दोघे रा. चिखली, असे कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येऊन शाळांची तपासणी करण्यात येत आहे. त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल उच्च न्यायालयास सर्व शाळांची तपासणी करून सादर करण्यात येणार आहे.

शाळांना भेटी देत तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये प्रामुख्याने वर्गखोल्यांची स्थिती, शालेय परिसर स्वच्छता, मुला- मुलींचे स्वच्छतागृहे व त्यांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा,

शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शाळेला होणारा उपद्रवी घटकांचा त्रास, शाळा परिसरातील अवैध व्यवसाय, तंबाखूमुक्त शाळा, शालेय इमारती व परिसराचा फक्त शैक्षणिक प्रयोजनासाठी उपयोग होतो किंवा नाही, यासह इतर अनुषंगिक बाबी तपासल्या जात आहेत.

तालुक्यात जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही तपासणी होत असताना श्रीगोंदा शहरातील प्राथमिक शाळेजवळ सुमन सुपेकर ही महिला दारूविक्री करताना आढळून आल्याने जिल्हा न्यायाधीशांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.

तर चिखली, होलेवाडी, पारगाव, श्रीगोंदा फॅक्टरी, या ठिकाणी प्राथमिक शाळेच्या २०० मीटर वार्ड परिसरात चिखली येथील दिपक विठ्ठल झेंडे आणि अन्सार सत्तारभाई तांबोळी,

भाऊसाहेब खेतमाळीस पारगाव सु., स्वप्नील ढमे, जोशी वस्ती, श्रीगोंदा फॅक्टरी, अजिक्य होले होलेवाडी, श्रीगोंदा यांच्या दुकानात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा न्यायाधीशांनी या दुकान चालकांवर कोप्ता कायदा २००३ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe