महत्वाची बातमी:अफवा पसरविणार्‍यांविरुध्द कारवाई करणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

शहरातील वॉर्ड नंबर २ मध्ये आढळलेल्या रुग्णांमुळे भीती वाढली आहे. त्यामुळे हा वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

परंतु या ठिकाणी काही लोक अफवा पसरवत असून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

या ठिकाणी प्रशासन व्यवस्थित आपले कार्य बजावत असताना व गेले काही दिवस बर्‍याच प्रमुख व्यक्तींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना

अचानक याठिकाणी काहींनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पथकाला रॅपिड टेस्ट करण्यास विरोध करून टेस्टबाबत संभ्रम निर्माण होईल अशा स्वरूपाच्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे.

या अफवांमुळे नागरिक रॅपिड टेस्ट करून घेण्यासाठी येत नाहीत. सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. वैद्यकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या साथरोग नियंत्रणाच्या प्रयत्नात अडथळा आणणार्‍या,

समाजात अफवा पसरवणार्‍या प्रवृत्तींना या आवाहनाच्या माध्यमातून सक्त कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात येत आहे. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या असून

यात अनुचित प्रकारे अफवा पसरवल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment