अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- शहरासह जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
नुकतेच श्रीरामपूर शहरातील बोरावके कॉलेजच्या पाठीमागे यादवनगर भागात राहणाऱ्या सुमन रमेश यादव या घरालगत असलेल्या किराणा दुकानात एकट्या बसल्या असताना त्यांच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे गंठण भामट्यांनी हिसका मारून लांबवले.
ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी काळी विनानंबरची पल्सर वापरली. सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याआधीच पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved