जुन्या वादातुन तिघांनी विखेंचा पाच एकर ऊस पेटविला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-  जुन्या वादाचा राग मनात धरून शेवगाव तालुक्यातील सोनविहीर तिघा जणांनी तब्बल पाच एकर ऊस जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे .

याप्रकरणी मंदा ज्ञानदेव विखे (वय ३५, रा. सोनविहीर ता. शेवगाव) यांनी फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. .

विखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पती ज्ञानदेव, मुलगा प्रशांत, मुलगी प्रतिक्षा आम्ही असे आम्ही एकत्र राहतो. पती ज्ञानदेव व दिर नामदेव विखे यांच्या नावावर गट नंबर १४३ मध्ये अडीच अडीच एकर अशी एकुण पाच एकर शेतजमीन आहे.

त्यात संपूर्ण ऊस लागवड केली आहे. शुक्रवार ता.२९ रोजी रात्री ९ वाजता गावातील तुळशीराम हरिभाऊ विखे यांनी माझ्यासमोर सुदाम पांडूरंग तिडके, अमोल शिवाजी तिडके, हरिभाऊ कडुबा शिंदे यांनी जाळून टाकल्याचे सांगितले.

जाव शोभा विखे मी शेतात जावून पाहीले असता तेरा महिन्याचा संपूर्ण पाच एकर ऊस जळून गेला होता. त्यामुळे वरील तिघांनी मागील भांडणाच्या कारणावरुन ऊस जाळला असून अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पोलीसांनी तिघा जणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारचा पुढील तपास पो.ना. सतोष धोत्रे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News