अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-कायदा व सुव्यस्था अबाधित राहावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस प्रशासनाचा आपण आदर केला पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस सेवा करणाऱ्या खाकीवरच काही समाजकंटकांकडून हात उगारला गेला आहे.
शहरामधून जाण्यासाठी ट्रकमधील दोघांनी केडगाव बायपास चौकात पोलीस कर्मचार्याला दमबाजी करत त्यांच्या गणवेशाची कॉलर धरली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कमलेश दुबाल सिंग (वय- 45) व अंकित कमलेश सिंग (वय- 18 रा. भिलाई, छत्तीसगड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पोलीस कर्मचारी अनिल हराळ हे केडगाव बायपास चौकात वाहतूक वळवण्याचे काम करीत होते.
यावेळी पुण्याकडून नगरच्या दिशेला येणारा एक मालवाहतूक ट्रक (क्र. सीजे- 7 एझेड- 7503) त्यांनी अडवला. त्यानंतर या ट्रकमधील चालक कमलेश सिंग व अंकित सिंग यांनी हराळ यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी हराळ यांच्या गणवेशाची कॉलर व हात पकडला. तसेच त्यांना दमदाटी केली.
याबाबत हराळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे पुढील तपास करीत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved