कोपरगावात पुन्हा १९ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव शहरातील काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील १०१ व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये १८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

अहमदनगर येथे काल पाठवलेल्या ३० अहवालांपैकी गोरोबानगर येथील ६० वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून २९ अहवाल निगेटिव्ह आले.

तालुक्यात आता एकूण बाधितांची संख्या १३६ झाली असून त्यातील ९० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. एक महिला मृत झाली असून ४५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

कोपरगाव शहरात शनिवारी ११ रुग्ण बाधित आढळले होते. त्यांच्या संपर्कातील १०१ व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले.

त्यामध्ये एकूण १८ जनांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment