Radhakrishna Vikhe Patil : संगमनेर तालुक्यातील विविध १० गावांमधील रस्त्यांच्या कामांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे २६ कोटी ६० लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला आहे. विधीमंडळाच्या आधिवेशनात राज्य सरकारने मंजुर केलेल्या पुरवणी मागण्यांच्या निधीमधून सदर निधीला मान्यता मिळाली आहे.
तालुक्यातील वडगाव लांडगा ते वडगाव फाटा या राज्य मार्ग ५० च्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ६० लाख रुपये, गुंजाळवाडी येथील शारदा बेकरी ते गुंजाळवाडी बायपास पुल या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २५ लाख रुपये, मेडीकव्हर हॉस्पीटल ते गुंजाळवाडी या रस्त्याकरीता ३५ लाख रुपये,
वेल्हाळेरोड आडवाट ते अठरापगड वस्ती पर्यंतच्या रस्त्याकरीता २० लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग ६० ते मालदाडपर्यंतच्या रस्त्याकरीता ३ कोटी, पिंपळगावदेपा ते अंभोरे या रस्त्याकरीता ४ कोटी, निमगाव बुद्रूक ते शिरसगावधूपे, कोठेवाडी ते जवळेबाळेश्वर रस्ता ६ कोटी रुपये,
डिग्रस, अंभोरे, जाखुरी, निमगावटेंभी, हिवरगाव पावसा, झोळे, मिर्झापूर, पेमगीरी या गावांमधून जाणा-या रस्त्याकरीता १ कोटी २० लाख, राष्ट्रीय महामार्ग ६० ते हिवरगाव पावसा या रस्त्याकरीता २ कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग ६० ते चंदनापूरी, पिंपळगाव माथा, जवळे बाळेश्वर या रस्त्याकरीता ६ कोटी ५० लाख, बाळेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्याकरीता २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात आले होते. यासर्व रस्त्यांच्या कामाला राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे या रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामीण भागातील हे सर्व रस्ते शहरातून जाणा-या राष्ट्रीय आणि राज्य मार्गाशी येवून जोडलेले असल्यामुळे या गावांमधून येणा-या नागरीक, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची वर्दळ सातत्याने सुरु असते. शेती उत्पादीत माल गावामध्ये घेवून येण्यासाठीही रस्त्यांची मोठी अडचण लक्षात घेवून
स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी या रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळावा अशी मागणी पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली होती. निधी उपलब्ध झाल्यामुळे लवकरच या रस्त्यांची सर्व कामे मार्गी लागतील. निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ना.विखे पाटील यांचे आभार मानले आहे.