शेवगाव शहरात सात जण कोरोना बाधित तर 53 जणांची मात

Published on -

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने दिलासा मिळत आहे. शेवगावमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. काल (गुरुवार) शेवगावमध्ये नव्याने ७ कोरोना रुग्ण आढळून आले.

एकूण 67 नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये 7 जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आली तर 60 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

या सात रुग्णांमध्ये नाईकवाडी मोहल्ला येथे 50 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुण असे 2, इंदिरानगर येथे 39 वर्षीय पुरुष, म्हसोबानगर येथे 36 वर्षीय पुरुष,

श्रीराम कॉलनीमध्ये 43 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथे 44 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे. शेवगाव तालुक्यात एकूण रुग्ण 84 झाले असून ३० ऍक्टिव्ह रुग्ण आहे.

५३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केले आहे

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe