अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.
नुकतेच राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत तीन वार्डातून नऊ जागेसाठी पंधरा उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने काही जागा निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत आहेत.
विशेष म्हणजे शिक्षित तरुणांनीच ही निवडणूक हाती घेतल्याने विकासाबाबत पाथरेकरांच्या अपेक्षा वाढल्या. नऊ जागांसाठी फक्त पंधरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यात वार्ड नंबर एकमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी श्रीधर एकनाथ जाधव हा एकच अर्ज दाखल असून सर्वसाधारण स्त्री मतदारसंघात नीता गीताराम घारकर, तर अनुसूचित जमातीमधून भानुदास गांगुर्डे, अजितकुमार धुळे, अशोक धुळे, दीपक गांगुर्डे आदींचे अर्ज दाखल आहेत.
वार्ड नंबर २ मध्ये सर्वसाधरण पुरुष सचिन गणपत काळे, अच्युत जाधव, सर्व साधारण स्त्री मतदारसंघात गंगुबाई जाधव व मनीषा जाधव यांनी अर्ज दाखल केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved