पितृपक्ष पंधरवाड्यात पितरांचे जेवण पडले महागात, तब्बल १८ जण …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- पितृपक्ष पंधरवाड्यात पितरांच्या जेवणास उपस्थितांपैकी १८ जण कोरोना बाधित आढळले आहेत. ही घटना रविवारी तपासणीनंतर उघडकीस आली.

जेवणानंतर अनेकांना सर्दी, खोकला सुरू झाला. त्यामुळे धावपळ उडाली. प्रशासनाने राजूर गाव पाच दिवस लाॅकडाऊन केले आहे.

या जेवणास उपस्थित असलेले अनेक जण आपण पॅाझिटिव्ह तर नाहीत ना, या भीतीने तपासणी करून घेत आहेत. उपस्थितांपैकी काहींना राजूर येथील रुग्णालयात, काहींना संगमनेरला, तर काहींना अकोल्यात तपासणीस पाठवण्यात आले

आहे. राजूर ग्रामीण रुग्णालय, गर्दणीत खानापूर येथील कोविड सेंटरमध्ये ४७ जणांची तपासणी करण्यात आली. तब्बल १८ पॅाझिटिव्ह आढळले.

कोरोना रोखण्याबाबत प्रशासन, राजूरचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिसांची तातडीची बैठक घेण्यात येऊन राजूर गाव पाच दिवसांसाठी बंद करण्याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment