अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :दौंड रोडवरील अरणगाव शिवारातील एका हॉटेलवर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकला. येथे हुक्का पार्टी सुरु असल्याची खबर मिळाली होती.
या छाप्यामध्ये नगर तालुका पोलिसांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यादरम्यान उच्चभ्रू समाजातील मुला- मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
यामुळे नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. करोना काळात हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नसताना देखील दौंड रोडवरील हे हॉटेल सुरू होते.
या हॉटेलमध्ये नगर शहरातील प्रतिष्ठित घराण्यातील तरूण-तरूणी हुक्का पार्लरचा आनंद घेत होते. याची माहिती निरीक्षक रजपूत यांना मिळताच त्यांनी संध्याकाळी आठच्या सुमारास पथकासह छापा टाकला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews