Ahmednagar News : जिल्ह्यात अनेक ठिकणी स्मशानभूमीचा अभाव आहे. येथे जन्माला आल्यापासून ते थेट सरणावर जाईपर्यंत नागरी सुविधांची वानवा अनुवयास मिळते. विकास कामांवर दरवर्षी जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च केला जात असतांना मात्र अंतिम श्वास घेतल्यानंतर स्मशानघाटाकडेचा प्रवासही खडतर होत आहे. स्मशानभूमी ही गावची मूलभूत गरज आहे.
मात्र, जिल्ह्यातीलअनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या गावांमध्ये उघड्यावर अथवा माळरानावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की गावातील ग्रामस्थांवर येत आह. त्यातच अनेक ठिकणी दशक्रियाविधीसाठी ओटे देखील नाहीत त्यामुळे अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी देखील नागरिकांचे हाल होतात.

नुकतेच राहुरी तालुक्यातील उंबरे गावात तर दशक्रियाविधीला मयताच्या कुटुंबांतील सदस्यांनी चक्क पडलेल्या झाडावर बसून मुंडन करावे लागले. उंबरे गावातील स्मशानभूमीसाठी मोठा परिसर आहे. या ठिकाणी गेल्या पाच वर्षांपूर्वी सांगली सुव्यवस्थित करून ठेवली आहे. परंतु, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या या स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत उगले आहे.
तसेच झाडांचा पालापाचोळाही मोठ्या प्रमाणात पडला आहे. याच स्मशानभूमीत झाडे भरपूर प्रमाणात असल्याने काकस्पर्श ही वेळेवर होतो. मात्र, काही जुनाट झाडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अनेक वेळा कल्पना देऊनही त्यांनी ते काढण्यासाठी कानाडोळा केला आहे.
दोन दिवसापूर्वी पावसामुळे मोठे एक झाड दशक्रियाविधीसाठी मुंडन करण्याठी बांधलेल्या ओट्यावर व संरक्षक भिंतीवर पडल्यामुळे मयताच्या दशक्रियाविधीला नातेवाईकांना या झाडावरती बसून मुंडन करणची वेळ आली.
ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी या ठीकाणी काही निझूर रव जुनाट झालेली निलगिरीचे झाडे काढून या ठिकाणी वडासारखी झाडे लावण्यात यावी, अशी मागणी उंबरे ग्रामस्थांकडून होत आहे.
काही दिवसापूर्वी उंबरे येथील एका महाराजांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी लाखो वारकरी नगर जिल्ह्यातून आले होते. त्यावेळी त्यांनी या स्मशानभूमीची अवस्था पाहून या गावच्या पदाधिकाऱ्यांना निंदा केली.
या ठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. त्यासाठी कुठल्याही पाण्याची व्यवस्था नाही. अंत्यविधीच्या वेळी मुखाग्नी देणाऱ्या कुटुंबातील सदस्याला बारवेवर जाऊन पाणी शेंदण्याची वेळ येते. पाण्याचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.