‘ह्या’ तालुक्यात पुन्हा १२ लोकांना कोरोनाची बाधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.

काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय चांगलेच रोवले आहेत.

काळ आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत ११३ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यातील ७४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.

कोपरगाव शहरातील सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ५२ व्यक्तीची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

तसेच खासगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या कोळगाव थडी येथील २० वर्षीय पुरुषाचा अवाहल पॉझिटिव्ह आला. या १२ रुग्णांमध्ये शहरातील इंदिरानगर येथील ५० वर्षीय महिला, गांधीनगर येथील ४५ व २६ वर्षीय महिला,

स्वामी समर्थनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय महिला, गुरुद्वारारोड येथील २५ व ४२ वर्षीय पुरुष, सुभाषनगर येथील ५० वर्षीय पुरुष,

बैलबाजार रोड येथील ५२ वर्षीय पुरुष तसेच तालुक्यातील पढेगाव येथील ८ वर्षीय मुलगा, तर तालुक्यातील मंजूर येथील एक ६० वर्षीय महिला, कोळगाव थडी येथील २० वर्षीय तरुण आदींचा समावेश आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment