‘ह्या’ तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 138 वर जावून पोहोचला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

आता नव्याने श्रीरामपूर शहरासह तालुक्यात 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 138 वर जावून पोहोचला असल्याची

माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली. नव्याने सापडलेल्या रुग्णामधील ८ लोकांचे स्वॅब 14 जुलै रोजी आरोग्य विभागाने शहरात घेतलेल्या शिबिरातील असून नगर येथील अहवालात 6 जणांचा समावेश आहे.

या 14 जणांमध्ये वॉर्ड नं. 1 मध्ये दोन, वॉर्ड नं. 2 मध्ये चार, वॉर्ड नं. 6 मध्ये दोन, वॉर्ड नं. 7 मध्ये दोन, बेलापूर, खंडाळा, महांकाळवाडगाव, तर प्रभातमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

काल 56 जणांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. दरम्यान, श्रीरामपूर कोरोना उपचार केंद्रातून 56 लोक बरे होऊन परतले असून 50 लोकांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत 681 जणांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. त्यापैकी 418 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर आतापर्यंत 138 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment