या कारणावरून केला तिन महिलांचा विनयभंग या तालुक्यातील घटना : दोघेजण अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- मोटारसायकलला कारचालकाचा धक्का लागला त्यावरून कारचालकाला गाडी हळू चालव असे सांगितल्याचा राग आल्याने कारचालचालक व त्याच्यासोबत असलेल्या अन्य एकजण असे दोघांनी त्या मुलास मारहाण केली.

यावेळी मध्यस्ती करणाऱ्या तिन महिलांचा या दोघांनी वियभंग केल्याचा गंभीर प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर असे की,

तालुक्यातील पोहेगाव खूर्द मध्ये एक महिला व तिचा मुलगा मोटारसायकलवरून जात असताना स्वीप्ट कार (नं.एमएच ९७ एझेड ८०२६) हिचा दुचाकीला धक्का लागला

तेव्हा दुचाकीवरील महिलेचा मुलाने कारचालक सखाराम शेरपाळे व गोरख सानप यांना म्हणाला गाडी हळू चालवा धका लागला असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी त्या मुलास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.

तेव्हा महिला समजून सांगत असताना तिचा हात घरुन अंगावरील साडी धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. हा प्रकार पाहून तेथे तीन नातेवाईक महिला भांडणे सोडविण्यास आल्या असता

या दोघा आरोपींनी तिन्ही महिलांच्या अंगावरील साझ्या ओढून  त्यांना लजा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. याबाबत पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून सखाराम बबन शेरमाळे,

गोरख पांडुरंग सानप (दोघे रा.पारेगाव खुर्द, ता.संगमनेर) यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आता. या दोघांना अटक करण्यात आली असून, पोसई सानप हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment