अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. निलेश शेळके याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे.
याआधी 2 जानेवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडी दिली होती.त्याची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी त्याच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी डॉ. निलेश शेळके याला पुण्यातून अटक केली होती.
शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणी शेळके याच्या विरुध्द सप्टेंबर 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. एकूण 5 कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved