अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ हॉटस्पॉटमधील लॉकडाऊन वाढविला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :-  नेवासा शहर हॉटस्पॉट पॉकेट म्हणून १३ एप्रिल रोजी जाहीर केल्यानंतर शहरातील हॉटस्पॉट मधील लॉकडाऊन १९ एप्रिल ते २७ एप्रिलपयंर्त वाढविल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले.

या दरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा ही २७ एप्रिलपयंर्त पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. नेवासा शहरात १३ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्यानंतर प्रशासनाने शहर संपूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला होता.

आता हा लॉकडऊन २७ एप्रिल पयंर्त वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील सर्व दवाखाने, सर्व बँका, किराणा दुकाने, मेडिकल दुकाने तसेच भाजीपाला विकणारे हे दुकानेही बंद राहणार आहे.

दरम्यान रस्त्यावर कुणीही फिरू नये,अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वेळ प्रसंगी वाहनेही जप्त करण्यात येतील.

शहरातील किराणा, मेडिकल, दूध, भाजीपाला या सर्व वस्तू नेमून दिलेल्या दुकानदारांना मोबाईलवर फोन केल्यानंतर घरपोहोच मिळतील, अशी माहिती तहसीलदार सुराणा यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment