अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील कोरोना हद्दपार होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. जवळपास 97 टक्के कोरोना रिकव्हरी रेट देखील जिल्ह्याचा झाला आहे.
मात्र असे सर्व काही असताना जिल्ह्यातील एका गावात कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथे 15 करोना रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर करोना ग्रामसमितीने गाव संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव 5 दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. पिंपळवाडी येथे नुकतीच ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीनंतरही काही रुग्ण वाढल्याचे बोलले जाते. एकूण 15 रुग्ण पिंपळवाडीत आढळून आले आहेत. रुग्ण वाढू नयेत म्हणून सरकारी परिपत्रकाच्या अधारे करोना ग्रामसमितीने गाव बंदचा निर्णय घेतला आहे.
27 जानेवारी ते 31 जानेवारी असे पिंपळवाडी बंद करण्यात आले आहे. गावातील मेडिकल, दवाखाने, दुध संकलन यांना मात्र बंदमधून अत्यावश्यक म्हणून वगळण्यात आले आहे.
किराणा दुकानांना काही काळ परवानगी देण्यात आली आहे. मात्र आठवडे बाजार, केशकर्तनालयाची दुकाने, पार्लर, हॉटेल, नाष्टा सेंटर, थंड पेय, चहा, पानटपरी, रसवंतीगृह, व्यायामशाळा हे सर्व लॉकडाऊन असेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved