MSRTC : वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारपासून (दि.१३) सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचा आज दूसरा दिवस आहे.
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन महामंडळाने दिले होते.

मात्र त्याला चार महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने एसटी संघटना कर्मचाऱ्यांनी १३ फेब्रुवारीपासून राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यात नगर विभागीय कार्यालयासमोरही कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
सन २०१८ पासूनची महागाई भत्याची थकबाकी द्यावी, एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्यावी, एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी,
मूळ वेतनात सर्वांना सरसकट ५ हजार रुपये वाढ द्यावी, शासकीय कर्मचाऱ्यांएवढे वेतन मिळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्यासह मिळावे, शिस्त व अपिल कार्यपद्धतीचा भंग करून देण्यात येणाऱ्या नियमबाह्य शिक्षा रद्द कराव्यात,
वैद्यकीय बिलांच्या प्रतिपूर्तीऐवजी कॅशलेश योजना सुरू करावी, आयुर्मान संपलेल्या बस बाद कराव्यात, चालक-वाहक वेळापत्रकातील त्रुटी दूर कराव्यात, सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात,
कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना फरक न भरता सर्व प्रकारच्या एसटी बसेसमध्ये एक वर्षासाठी मोफत पास देण्यात यावा, सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पती- पत्नीसह एक वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये फरक न भरता देण्यात यावा,
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा तत्काळ मिळाव्यात, हिट अँड रनचा कायदा रद्द करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आंदोलनात नगर एसटी संघटनेचे डी. जी. अकोलकर, शिवाजी कडूस, उत्तम रणसिंग, रोहिदास आडसूळ, नंदकुमार तरवडे, शंकर डहाणे, बाळासाहेब सोनटक्के, कुंडलिक