इंदोरीकर महाराज म्हणतात.. ‘कविता करून बाप समजत नसतो तर त्यासाठी बापाचं काळीज असावं लागतं ‘

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : मुलगी पळून गेल्यावर आई-वडिलांची होणारी परिस्थिती, व्यसनामुळे कमी वयात मरण पावणारे मुले आणि जन्मदात्या आई-वडिलांचा संभाळ न करणारी मुलं तसेच नुसत्या कविता करून बाप समजतं नसतो.

तर त्यासाठी बापाचं काळीज असावं लागतं असे सांगताच उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वारकरी सांप्रदायाची तुलना कोणत्याच क्षेत्राशी होऊ शकत नाही, जगात सर्वात श्रीमंत माणूस हा वारकरी असून, तो ज्ञानोबा रायांचा प्रसाद असल्याचे मत कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.

श्रीगोंदा शहरात विचारांची हंडी ही कोट्यवधी रुपये खर्च करून साजऱ्या होणाऱ्या दहिहंडीपेक्षा कितीतरी पटीने भारी आहे. अशाचप्रकारे दहीहंडी उत्सव साजरा होणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट त्यांनी व्यक्त केले.

काँग्रेस नेते घनश्याम शेलार आणि मित्रमंडळाच्या वतीने श्रीगोंदा शहरात आयोजित विचारांची हंडी, या कार्यक्रमात इंदोरीकर महाराज कीर्तनात बोलत होते.
यावेळी त्यांनी आपल्या खुमासदार विनोदी शैलीतून समाजातील अनेक चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकत लोकांना समाधानी राहण्याचा आणि मुलांवर संस्कार करण्याचा मौलिक सल्ला दिला.

तसेच नेत्यांनी आपल्या गावातील शाळांकडे लक्ष द्यावे, शाळा सुधारल्या तर उद्याची पिढी चांगली तयार होईल, हीच खरी गोकुळाष्टमी असे सांगत चारित्र्याला डाग लागु देऊ नका, व्यसनांपासून लांब रहा, अंगातील ताकद, खिशातील पैसा आणि आपल्याजवळील वेळ जपून वापरण्याचा मौलिक सल्ला देतानाच महाराजांनी आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजनही घातले.

मानवता हा एकमेव धर्म असन. त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे, संपत्ती टिकवायची असेल तर संतती चांगली पाहिजे, माणसाने समाधानी राहिले पाहीजे. आणि समाधानी राहाण्यासाठी भजन करणे हाच पर्याय असल्याचे महाराजांनी सांगितले.

या कार्यक्रमात इंदोरीकर महाराज यांच्या हस्ते वेगवेगळी पुस्तके असलेली हंडी फोडण्यात आली, त्यानंतर त्यातील पुस्तके वाचनालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आली.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe