Indorikar Maharaj : कीर्तनकार इंदोरीकर महाराज लस घेईपर्यंत त्यांच्या कीर्तनावर बंदी….

Ahmednagarlive24
Published:

नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्य तसेच कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश देणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.

नुकतेच त्यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून एका नव्या वादाला फाटा फुटला आहे. आता त्यांच्या या वक्तव्याला प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.

इंदुरीकर महाराज यांनी लस घेईपर्यंत, त्यांच्या कीर्तनावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी बीडच्या शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना केलीय. ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलीय.

कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, असं इंदोरीकर महाराज 3 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याविरोधात ही मागणी करण्यात आली असल्याचे समजते आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? याबाबत थोडक्यात जाणून घेऊ…
“काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी मी लस घेणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे जनजागृती करणाऱ्यांचं खच्चीकरण होत आहे.

त्यामुळे इंदुरीकर महाराज जोपर्यंत लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कीर्तन होऊ देऊ नये,” असं बीडमधील एका किसानपुत्राने म्हटलंय. या नव्या मागणीमुळे इंदोरीकर महाराज आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe