इंदोरीकर महाराजांना दिलासा ‘या’ कारणामुळे सुनावणी पुढे ढकलली..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-पुत्रप्राप्तीबाबतच्या विधानावरून वादग्रस्त ठरलेले निवृत्ती महाराज (इंदोरीकर) यांच्या खटल्याची सुनावणी त्यांचे वकील के. डी. धुमाळ आजारी असल्याने पुढे ढकलण्यात आली.

ही सुनावणी आता ८ डिसेंबरला होणार आहे. ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांवर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशाने येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.

मंगळवारी सरकारी वकिलांचा युक्तिवाद होणार होता. मात्र, इंदोरीकरांचे वकील धुमाळ आजारी असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या खटल्याकडे नगर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायासह राज्याचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment