अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : राज्यात बौद्ध समाजावरील अन्याय, अत्याचारांत वाढ झाली. या घटना त्वरित थांबवण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी जामखेड करत बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे व काॅन्स्टेबल भागवत व भोस यांना निवेदन देण्यात आले.
नागपूर येथील अरविंद बनसोडे या युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. विराज जगताप (पिंपरी चिंचवड) याची जातीयवादातून अमानूष मारहाण करून हत्या करण्यात आली.
भूम तालुक्यातील असलेल्या ढगे चिंचपूर येथे बौद्ध जयंती साजरी केल्यामुळे गावगुंडांनी बौद्ध कुटुंबावर हल्ला केला. याचा जामखेड तालुका बौद्ध संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
आरोपींना शासनाने पाठिशी न घालता यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करून जलद गतीने न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews