‘त्या’ निकृष्ट गोळ्यांची चौकशी करत दोषींवर कारवाई करा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-जिल्हा परिषदेमार्फत अर्सेनिक गोळ्यांच्या वाटपात निकृष्ट गोळ्यांची चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना शिवराष्ट्र सेनेच्यावतीने देण्यात आले.

या निवेदनात म्हंटले आहे कि, कोरोना काळात पुणे येथील कंपनीने निविदा भरुन त्यास वर्कऑर्डर देऊन महानगरपालिका हद्दी वगळून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना अर्सेनिक गोळ्याचे वाटप होणे गरजेचे होते.

परंतु काही भागात या गोळ्या पोहच झाल्या नाहीत व जेथे पोहच केल्या त्या ठिकाणी त्या निकृष्ट दर्जाच्या होत्या. कोरोना सारख्या महामारीत नागरिकांना उपयुक्त अशा रोगप्रतिकार शक्ती वाढविणार्‍या गोळ्या शहरी व ग्रामीण भागात लोकांनी अक्षरश: जादा पैसे देऊन घेतल्या.

गोळ्या अभावी अनेकांना कोरोनाची लागण होऊन हॉस्पिटलचे लाखो रुपयांचे बील भरावे लागले. शासनाने या गोळ्या सर्वसामान्य नागरिकांना मोफत दिल्या परंतु प्रशासकीय उदासिनतेमुळे या गोळ्यांचे पाणी झाले.

त्यामुळे सुमारे 38 लाख 41 हजार 995 लोकांनापर्यंत या गोळ्या पोहचल्या नाहीत. कोट्यावधी रुपयांच्या या गोळ्या विकत घेऊनही जनतेला याचा काहीही उपयोग झाला नाही. ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती,

त्यांची चौकशी करुन हालगर्जीपणा करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आपल्या दालनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे शिवराष्ट्र सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment