अहमदनगर हिंदूत्ववाद्यांची प्रयोगशाळा होतेय का ? दुसऱ्या या राज्यातून येणार ‘हे’ आमदार !

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कडवे हिंदुत्व असणारे कालिचरण महाराज येऊन गेले. आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजासिंह हे सोमवारी नगरमध्ये येतायेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या सयुंक्त विद्यमाने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे.

एकीकडे जमावबंदीचा आदेश दुसरकिडे सभेसाठी परवानगी अर्जच नाही
जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सभेसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. पण त्यांच्याकडे परवानगीसाठी कोणताही अर्ज नसल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले.

राजासिंहांचा व्हिडिओ होतोय व्हायरल
विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षे पूर्ण होत असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरात शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिणेत ही मिरवणूक काढण्यात आली. कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, पारनेर या गावांतून मिरवणूक काढण्यात आली.

आता या पार्श्वभूमीवर शहरात सभा घेण्यात येणार आहे. तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह हेदेखील उपस्थित राहणार आहेत. आमदार टी. राजा सिंह यांचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अहमदनगर हिंदूत्ववाद्यांची प्रयोगशाळा होतेय का ?
अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कालिचरण महाराज येऊन गेले. आता भाजप आमदार टी. राजासिंह यांची होणारी सभा यामुळे नगर जिल्हा हिंदूत्ववाद्यांची प्रयोगशाळा झाली आहे अशी चर्चा नागरिकांत आहे.

त्यातच आता आमदार टी. राजासिंह यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये नगरचा उल्लेख ‘अहिल्यानगर’ केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरचे ‘अहिल्यानगर’ करत असल्याची घोषणा केल्यापासून हिंदुत्ववादी संघटना कार्यक्रम पत्रिकांवर ‘अहिल्यानगर’, असा उल्लेख करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe