राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे ही शासनाची जबाबदारीच – आ.डॉ.तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- मागील अनेक वर्ष विनाअनुदानित शाळांवर अनेक शिक्षक व कर्मचारी विनावेतन काम करत आहे.शासनाचे सर्व निकष व गुणवत्तापूर्ण करूनही या शाळांना अनुदान मिळालेले नाही.

महाराष्ट्रात नवनियुक्त लोकउपयोगी असणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारने महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तपासणी समितीने केलेल्या शिफारशी स्विकारत तातडीने सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सरकारकडे केली असून ही शासनाची जबाबदारीच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने नुकतेच शाळांना अनुदान देण्याबाबत स्वेच्छा निर्णय जाहीर केला यावर बोलताना आमदार डॉ तांबे म्हणाले की, फुले- शाहू- आंबेडकरांचा वारसा सांगणार्‍या या महाराष्ट्रात सर्व विद्यार्थ्यांना सरकारने बारावी पर्यंतचे मोफतच दिले पाहिजे. म्हणून अनुदान देण्याबाबत कोणताही स्वेच्छा निर्णय घेण्याऐवजी सर्व विनाअनुदानित शाळा व तुकड्यांना तातडीने व प्राधान्याने अनुदान द्यावे.

शिक्षणाबाबत समाजामध्ये दोन स्तर निर्माण झाले आहेत. श्रीमंतांची मुले इंग्रजी माध्यमाच्या उच्चभ्रू शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र गोरगरीब व ग्रामीण भागातील मुले ही विनाअनुदान शाळांमधून शिक्षण घेत आहे.या शाळांना अनेक वर्ष अनुदान नसल्याने या शाळांमधून शिकवणारे शिक्षणही विनावेतन काम करत आहे. या शिक्षकांच्या वेतनासाठी व शाळेच्या गुणवत्तेसाठी वारंवार शासनाकडे अनुदानासाठी मागणी केली आहे.

व शासनाने ते मान्यही केले होते. मात्र मागील सरकारने अत्यंत जाचक अटी लादल्याने या शाळांना अनुदान मिळू शकले नाही .याबाबत अनेक वेळा शाळांच्या तपासण्या केल्या गेल्या मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र या शाळांना अनुदान द्यावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तपासणी समिती तयार केली .

या समितीने केलेल्या सर्व शिफारसी सरकारने तातडीने स्वीकारून सर्व विना अनुदानित शाळांना नव्याने कोणतीही तपासणी न करता विनाअट अनुदान द्यावे. तरी अनुदान देण्याबाबत कोणताही स्वेच्छा निर्णय घेण्याऐवजी सर्व विनाअनुदानित शाळा व तुकड्यांना तातडीने व प्राधान्याने अनुदान द्यावे यासाठी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांनी लक्ष घालत अनेक वर्ष विनावेतन काम करणार्‍या शिक्षकांना व गोरगरिबांच्या मुलांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांनी सरकारकडे केली असून याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करून अनुदानासाठी लढत राहू. असेही त्यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment