आता मंत्रीपद टिकविण्यासाठी बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर : नेहरु, गांधी यांचे विचार सोडून काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना मातोश्रीच्या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्थान आहे, याबद्दल न बोललले बरे मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळाले.

आणि आता मंत्रीपद टिकविण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. विखेंना त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना पाहिलेय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विखेवर केली होती.

लोणी येथे पत्रकारांशी बोलताना विखे यांनी थोरात यांच्यावर पुन्हा टिकाश्र सोडले. ते म्हणाले,प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही.

त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची कशी वाताहत झाली, हे महाराष्ट्र पाहत आहे. स्वत:चे कर्तृत्व काहीच नाही. यापूर्वी राज्यात अशी परिस्थिती कधीही नव्हती.

सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला आठ-आठ दिवस मुख्यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत. एवढी लाचारी पत्करुन ते सत्तेत का राहातात असा मोठा सवाल उपस्थित केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment