अहमदनगर :- भारत देशावर कोरोना संसर्ग विषाणूचं संकट आलेले आहे. अतिशय गंभीर असे हे संसर्ग असल्यामुळे देशावर मोठे संकट उभे झालेले आहे. या संकटकाळात या कोरोना विषाणूस रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे.
त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे देशामध्ये अनेक उद्योगधंदे व व्यवसाय बंद आहेत. देशात हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
नगर शहरमध्ये जेव्हा जेव्हा विविध संकटे आली आहेत, तेव्हा तेव्हा आ. अरुण काका जगताप व आ. संग्राम जगताप पुढे येऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात.
या काळातही सर्वात प्रथम पुढे येऊन गरजू कुटुंबांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किरणाची सोय उपलब्ध करुन दिली. ही बाब कौतुकास्पद आहे.
या पुढील काळातही त्यांच्यासाठी काम करणे आपल्याला गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन या कामात योगदान देऊ या, असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी यावेळी केले.
कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात गरीब व गरजू कुटुंबांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून किरणा मालाची वाटप करताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया. समवेत आ. संग्राम जगताप, विक्रम फिरोदिया, आशाताई फिरोदिया आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, कोरोना संसर्ग विषाणूचे आलेल्या संकटकाळात गरजूंना किराणा माल देऊन त्यांना थोडासा आधार देण्याचे काम आम्ही प्रेरणा प्रतिष्ठान व शहरातील नामवंतांच्या मदतीने करत आहोत. त्यात आम्हाला सर्व स्तरातून जनतेचे योगदान मिळत असल्याचे ते म्हणाले.