जरे यांच्या वकिलांनी केली पोलीस संरक्षणाची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-  रेखा जरे खुन प्रकरणात बाळ बोठे याच्यासह त्याच्या हितर्चितकाकडून धमकी येण्याची शक्यता असल्याने मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी जरे यांचे वकील सचिन पटेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्याविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तर बाळ बोठे हा फरार आहे. बाळासाहेब बोठे याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणातील फिर्यादी सिंधुताई वायकर यांच्यावतीने सरकार पक्षाला मदत व्हावी म्हणून माझे वकीलपत्र दाखल केले आहे.

मात्र कोर्टाने अटकपूर्व जमीन अर्ज नामंजूर केलेला आहे. त्यामुळे बाळ बोठे याने संभाजीनगर खंडपीठात अटकपूर्व जमीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात मुळ फिर्यादीतर्फें मी वकीलपत्र दाखल करणार आहे.

अशा परिस्थितीतमध्ये बाळासाहेब बोठे याच्यासह त्याच्या हितर्चितकाकडून मला व माझ्या कुटुंबाला धमकाविण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला अटक होईपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ऍड. पटेकर यांनी केलो आहे.